Pages:
Author

Topic: Marathi - Maharashtra (India) | अधिकृत बीटकॉईन मराठी चर्चा धागा (Read 14828 times)

member
Activity: 280
Merit: 28
How does one type in the Devanagari script on this forum?  I'm using IE 11 on Windows 7 Prof.
copper member
Activity: 182
Merit: 2
शुभ प्रभात, तुमच्याकडे काही अतिरिक्त sMerit आहेत काय.? जर असतील, तर तुम्ही माझ्या पोस्टची गुणवत्ता ठरवुन मला मदत करू शकता....
ह्या माझ्या पोस्ट :-
१. https://bitcointalksearch.org/topic/m.34137341

२. https://bitcointalksearch.org/topic/m.34140435

३. https://bitcointalksearch.org/topic/m.34206877

४. https://bitcointalksearch.org/topic/--3088619

५ . https://bitcointalksearch.org/topic/m.34727257

धन्यवाद..! Smiley
hero member
Activity: 1190
Merit: 534
बिटकॉइन व्यतिरिक्त इतरही अनेक नवे कॉईन बाजारात येत आहेत त्यातले बहुतांश नकली आणि चोरीच्या उद्देशाने आले असले तरी काही कॉईन हे चांगल्या संकल्पनेसह येत आहे उदाहरणार्थ रिपल (सध्याची किंमत ९ रुपये ६१ पैसे), हा कॉईन बॅंकांनी वापरण्यासाठी तयार केला गेला आहे आणि एका सेकंदाला १ हजार व्यवहार हाताळू शकतो म्हणजे दिवसाला ८ करोड ६४ लाख व्यवहार हाताळण्याची क्षमता असल्यामुळे कोणताही व्यवहार ४ ते ५ सेकंदात पूर्ण होतो. सध्या यस बॅंक आणि स्टॅंडर्ड चार्टड सह ७५ हुन अधिक बँका हा कॉईन वापरत आहेत.

सदर कॉईनची आताची किंमत ९६ रुपये आहे, भविष्यात असेच मोठे चढ उतार संभवतात
newbie
Activity: 1
Merit: 0
I am a Maharashtrian guy looking for a partner from Mumbai or nearby cities to work with in crypto industry.

I have observed that there are many opportunities to make some handsome money, like importing Bitcoins & selling them here, inter as well as intra exchange arbitrage, picking up right coins, playing with shitcoins etc. etc.

I just get bored alone by sitting in front of my laptop all the time in my home. Now I feel like there should be some place like an office where I can work with some colleague(s), which will help me to get rid of this boringness. Plus an extra pair(s) of hands will make the job easier & faster. Many hands make light work.

Wrote this post just to find someone who is in the same situation as mine & is also looking for someone to work with.

The criterias I feel like I must add here are that the person must be
1.   Willing to give time
2.   Willing to do research
3.   Willing to work hard

& better if he/she,
1.   Is a pro in cryptos
2.   Is a pro in trading.

To be frank, I am neither a pro in crypto nor in trading. I have been in this field since only a few months. I do trading / investing only on the basis of my research from various forums & social networking sites.

जर स्वारस्य असेल तर कृपया मला येथे प्रत्युत्तर द्या किंवा वैयक्तिकरित्या (PM) संदेश पाठवा

[plese contact me on my following email id [email protected]]
member
Activity: 95
Merit: 10
newbie
Activity: 34

बिटकॉईनच्या किंमतीमध्ये गेल्या काही काळात खूप चढ-उतार झाले, रुपये. १,२०,०००/- पर्यंत खाली जाऊन पुन्हा रुपये. ३,००,०००/- पर्यंत वाढ दाखवली. सध्या बिटकॉईनची किंमत रुपये. २,८५,०००/- च्या आसपास आहे.

असेच चढ-उतार यापुढेही शक्य आहेत त्यामुळे तुम्ही जर अशा परिस्थितीशी जुळवून घेऊ शकत नसाल तर गुंवणूक करू नका. बिटकॉईनची किंमत २० रुपयांवरून ३ लाखांवर पोहोचली ३ लाखांवरून २० रुपयांवर किंवा ३ करोड वर देखील पोहोचू शकते त्यामुळे जितके पैसे गमावल्यावर तुमच्या जीवनशैलीत फरक पडणार नाही तितके आणि तितकेच पैसे गुंतवा आणि तेही तुमची इच्छा आणि तुम्ही नियोजन व अभ्यास केला असेल तर आणि तरच.

बिटकॉइन व्यतिरिक्त इतरही अनेक नवे कॉईन बाजारात येत आहेत त्यातले बहुतांश नकली आणि चोरीच्या उद्देशाने आले असले तरी काही कॉईन हे चांगल्या संकल्पनेसह येत आहे उदाहरणार्थ रिपल (सध्याची किंमत ९ रुपये ६१ पैसे), हा कॉईन बॅंकांनी वापरण्यासाठी तयार केला गेला आहे आणि एका सेकंदाला १ हजार व्यवहार हाताळू शकतो म्हणजे दिवसाला ८ करोड ६४ लाख व्यवहार हाताळण्याची क्षमता असल्यामुळे कोणताही व्यवहार ४ ते ५ सेकंदात पूर्ण होतो. सध्या यस बॅंक आणि स्टॅंडर्ड चार्टड सह ७५ हुन अधिक बँका हा कॉईन वापरत आहेत.

पूर्ण अभ्यास केल्याशिवाय रिपल अथवा इतर कोणत्याही कॉईन/साईट किंवा इतर कुठेही गुंतवणूक करू नका अथवा तुम्हाला तुमची रक्कम गमवावी लागू  शकते.

गुंतवणूकीचा विचार करत असलात तर तुम्ही अभ्यास करून निवडलेला कॉईन लॉन्ग टर्मच्या हिशोबाने (किमान १० वर्षे) विकत घ्या आणि पेपर किंवा ऑफलाईन वॉलेट मध्ये जतन करून ठेवा व त्याचा बॅकअप सुद्धा ठेवा (पद्धत, धोके आणि इतर तांत्रिक बाबी यांची संपूर्ण माहिती घेतल्याशिवाय कोणतीही कृती किंवा निर्णय घेऊ नका), ऑनलाईन साईट हॅक होण्याचा धोका असतो. आधी अशा घटना घडलेल्या आहेत तेव्हा गुंतवणूकदारांनी कोट्यवधी रुपये गमावले आहेत अशा घटना पेपर किंवा ऑफलाईन वॉलेट नीट न ठेवल्यामुळे किंवा तयार करतानाच सदोष पद्धतीने तयार केल्यामुळे देखील घडल्या आहेत त्यामुळे अत्यंत काळजी घेणे अत्यावश्यक आहे.
hero member
Activity: 1190
Merit: 534
Wow where is this pamphlet being placed and who have placed it? Looks good and what is the purpose of it. Like any type of investment people have to do it so they can invest in btc or for their business purposes. Is this given in any type of meetup?

It would be great if you can speak in Marathi on this thread. I have created a separate thread regarding this.

https://bitcointalksearch.org/topic/m.17448529

This is Pune bitcoin users group.

hero member
Activity: 1218
Merit: 557
Wow where is this pamphlet being placed and who have placed it? Looks good and what is the purpose of it. Like any type of investment people have to do it so they can invest in btc or for their business purposes. Is this given in any type of meetup?
hero member
Activity: 1190
Merit: 534
आपल्या प्रतिक्रिया, सूचना, अवश्य कळवा..

बीटकॉईन संदर्भात सखोल माहिती देणाऱ्या विनामुल्य कार्यशाळा पुण्यामध्ये मराठीमधून आयोजित केल्या जातात, अधिक माहितीसाठी मला पर्सनल मेसेज पाठवा.

hero member
Activity: 1190
Merit: 534
I am also from Maharashtra, but don't know Marathi. Sad
I want to know that considering demonetization which is going on currently in India, do you think that it will affect the use of Bitcoins here as well any involvement of a Regulatory Body soon?

Interesting, You can learn Marathi through English from this website,

kaushiklele-learnmarathi.blogspot.com.

Now coming back to your question, Yes demonetisation issue is affected bitcoin but in a positive way. Have a look on this thread.

Hello There,

India bans top currency notes such as Rs.500/- and Rs.1,000/- to prevent black money. Now there are only three notes in circulation Rs.10, Rs.20 and Rs.50

http://www.thehindu.com/news/national/live-narendra-modis-address-to-nation/article9320548.ece

Google for more news links.

Yes, There are some preventive measures taken to deal with the situation but still it is one of the masterstrokes by India prime minister Narendra Modi against black money.

How do you see this action and what kind of impact this will create on the bitcoin in India?

P-S : Adding some news headline since this move, worth reading Smiley

1) No cash, no plastic: India's demonetised economy rushes towards cryptocurrency.

2) India’s rupee restrictions are boosting demand for bitcoin.

3) Digital Currency the ‘New Normal’, says Indian Finance Minister After Cash Curb.

4)  Why Bitcoin Will Succeed in India in Just Two Years.

5)  India Encourages ‘Mission Mode’ Digital Currency Adoption.

Best
Dudeperfect

Visit the thread to read further discussion.

Which one should I apply for ad campaign?
Is this available for every blog forum or only this forum?
Please tell me more options for earning Bitcoins.

इतर संकेतस्थळांंबाबत मला कल्पना नाही, हे संकेतस्थळ तयार करताना दस्तुरखुद्द बीटकॉईनच्या निर्मात्याचा सहभाग होता  त्यामुळेच हे संकेतस्थळ इतरांपेक्षा वेगळे ठरते.

ह्या संकेतस्थळावर, तुम्ही जर उपलब्ध कोणत्याही कॅम्पेनसाठी पात्र असाल तर तुम्ही त्या कॅम्पेनमध्ये सामील होण्यासाठी विनंती करू शकता. सध्या तुमचे खाते Newbie ह्या दर्जाचे आहे आणी त्या दर्जाच्या सदस्यांसाठी सध्या कुठलेही कॅम्पेन उपलब्ध नाही. Junior पासून Legendary Member पर्यंत दर्जा असणाऱ्यांसाठी कॅम्पेन उपलब्ध आहेत.

उदाहरणार्थ :

सध्या उपलब्ध कॅम्पेन्स पैकी 777Coin हे कॅम्पेन Junior सदस्यांना रोज ८५७ सातोशी देते (एका पोस्टसाठी ३०० सातोशी).
तर 1XBIT कॅम्पेन Legendary सदस्यांना रोज ५,७१,४२८ सातोशी देते (एका पोस्ट साठी १,३०,००० सातोशी).

अर्थात सदस्य लिहीत असलेल्या पोस्ट्स देखील चांगल्या दर्जाच्या असणे अपेक्षित आहे, खात्याचा दर्जा Activity पॉईंटस् वर ठरवला जातो आणी तो दर १४ दिवसांनी अद्ययावत केला जातो.

खाते आणी त्यांच्या दर्जाबाबत अधिक माहिती इथे मिळेल.

उपलब्ध सिग्नेचर कॅम्पेन बाबत अधिक माहिती इथे मिळेल.

बीटकॉईन मिळवण्याचे १४ मार्ग

आपल्या मित्रमैत्रिणींना देखील बीटकॉईन बद्दल माहिती द्या आणी बीटकॉईनच्या प्रसाराला हातभार लावा.

newbie
Activity: 16
Merit: 0
I am also from Maharashtra, but don't know Marathi. Sad
I want to know that considering demonetization which is going on currently in India, do you think that it will affect the use of Bitcoins here as well any involvement of a Regulatory Body soon?

As per my understanding,
http://www.forbes.com/sites/panosmourdoukoutas/2016/12/25/bitcoin-investors-should-send-a-thank-you-note-to-indias-modi-and-venezuelas-maduro/

Add "Bitcoin" and "Bitcoin India" in Google News & Weather Android app for daily news about these.
legendary
Activity: 1218
Merit: 1007
I am also from Maharashtra, but don't know Marathi. Sad
I want to know that considering demonetization which is going on currently in India, do you think that it will affect the use of Bitcoins here as well any involvement of a Regulatory Body soon?
hero member
Activity: 1190
Merit: 534
 
Free Bitcoins (or micro or satoshi) kase milvayche??

नमस्कार आपले स्वागत आहे..

बीटकॉईन किंवा सातोशी मिळवण्यासाठी शेकडो Bitcoin Faucets उपलब्ध आहेत पण त्यातून मिळणारे उत्पन्न हे अतिशय कमी असते आणी त्यातून आपलेच नुकसान होते. म्हणजे समजा एखाद्या Bitcoin Faucet वर १,००० सातोशी (म्हणजे आजच्या भावानुसार ६६ पैसे) जरी मिळत असले तरी त्यासाठी तुम्हाला तुमची २ मिनिटं, वीज आणी इंटरनेटचा खर्च सगळं मिळून एक रुपया जरी पकडला तरी दर कृतीमागे आपले ३४ पैसे नुकसान होते.

त्यामुळे मी तरी Faucets पासून दूर रहाण्याचा सल्ला देईन, या उलट तुम्ही खालीलपैकी गोष्टींमध्ये सहभाग घेतला तर तुम्हाला कैक पटीने फायदा होईल.

१) सिग्नेचर कॅम्पेन – या संकेतस्थळावर अनेक कंपन्या त्यांची जाहिरात करण्यासाठी पैसे देतात, माझ्या सिग्नेचर मध्ये दिसत असलेल्या जाहिरातीसाठी सदर कंपनी मला दररोज ६ लाख सातोशी देते. तुमचे ह्या संकेतस्थळावरील अकाउंट किती जुने आहे आणी तुम्ही किती पोस्ट करता ह्यावर ही रक्कम ठरते.

२)  वस्तू किंवा सेवा – तुम्ही तुमच्या वस्तू किंवा सेवा देऊन त्याचा मोबदला म्हणून बीटकॉईन स्वीकारू शकता. यामध्ये डोमेन नाव, फेसबुकवर जाहिरात अशा वेगवेगळ्या गोष्टी देता येतात.

३) बीटकॉईन ट्रेडिंग – भारतात नोटाबंदीमुळे बीटकॉईन लोकप्रिय होत आहे आणी दिवसेंदिवस ही लोकप्रियता वाढत जाणार आहे त्यामुळे बीटकॉईन ट्रेडिंग हा अजून एक पर्याय आहे. localbitcoins.com सारख्या संकेतस्थळावर तुम्ही कमी दरात बीटकॉईन विकत घेऊन त्याच संकेतस्थळावर जास्त दरात विकू शकता ज्यामध्ये एका ट्रेड मध्ये तुमच्या गुंतवणुकीवर १% ते २०% पर्यंत उत्पन्न मिळवू शकता.

उदाहणार्थ : अनेकांना त्यांचे बीटकॉईन विकून पेटीम मध्ये पैसे हवे असतात तर अनेकांना त्यांचे पेटीएम मधील पैसे देऊन बीटकॉईन हवे असतात. तुम्ही योग्य किंमत देऊन मध्यस्त म्हणून काम केलेत तर तुमचा बराच फायदा होऊ शकतो.

बीटकॉईन मिळवण्याचे असे अजून शेकडो पर्याय आहेत त्यामुळे कोणत्याही पर्यायाचा अवलंब करताना त्याचा नीट अभ्यास करा. उत्पन्न मिळवा पण ज्ञान देखील मिळवत रहा.

काही वर्षांपूर्वी जेव्हा बीटकॉईनची किंमत काहीच नव्हती तेव्हा एका व्यक्तीने  पिझ्झा १०,००० बीटकॉईन देऊन विकत घेतला, त्यांनी जर ते बीटकॉईन नुसते ठेवले असते  तरी त्याची आजची किंमत ६६ करोड रुपये असती. त्यामुळे आज त्या पिझ्झाप्रमाणे इतर लहान मोठ्या कारणांसाठी, भविष्यातले लाखो रुपये वाया घालवू नका.

येणाऱ्या काळात हे तंत्रज्ञान जगावर राज्य करणार आहे आणी ज्याचे याबद्दल ज्ञान अधिक त्याला मोठी मागणी असणार आहे. ८ वर्षात बीटकॉईन ची किंमत ० रुपयापासून ६० हजारांवर पोहोचली, कदाचित पुढच्या ८ वर्षात ती दीड लाखावर पोहोचेल त्यामुळे बचतीची सुद्धा सवय ठेवा.

ता.क - आज दिनांक १७ ऑगस्ट २०१७ रोजी बिटकॉईनची किंमत रुपये. २,८५,०००/- आहे.

newbie
Activity: 16
Merit: 0
Mi pan Marathi...
Shivsmarak Sathi tayar raha...

Free Bitcoins (or micro or satoshi) kase milvayche??
hero member
Activity: 1190
Merit: 534
तुम्हाला Whats app किंवा अन्य मार्गाने बीटकॉईन किंवा इतर कॉईन ट्रेडिंग करणाऱ्या ग्रुप कडून अथवा इतर कोणाकडूनही अमुक अमुक कॉईन मध्ये गुंतवणूक करण्याबद्दल सांगितले तर गुंतवणुकीच्या आधी इंटरनेटवर त्याविषयी पूर्ण माहिती काढा.

पंप आणी डम्प सारख्या स्कीम मध्ये तुमचे पैसे गुंतवू नका, हि स्कीम म्हणजे कॉईन ची किंमत हळू हळू वाढवत नेली जाते आणी एका क्षणात ० होते, त्याने कॉईनच्या संचालकांचा फायदा होतो आणी इतरांचे नुकसान, तेव्हा काहीही झाले तरी स्वतः माहिती मिळवा, इतरांच्या माहितीवर विश्वास ठेऊ नका.. ‘जो दुसऱ्यावर विसंबला त्याचा कार्यभाग बुडाला’ हे लक्षात असुद्या..!!
hero member
Activity: 1540
Merit: 502
अर्थव्यवस्थेच्या बाबतीत आपण आधीच चीनच्या खूप मागे आहोत, बीटकॉईन सारख्या नव्या तंत्रज्ञानाचा प्रसार चीनमध्ये सर्वाधिक वेगाने होत आहे.. भारतातही याबाबत जनजागृती व्हायला हवी. जनधन योजना, स्टार्टअप इंडिया, कुशल भारत सारख्या योजनांमुळे नक्कीच याला गती मिळेल.

आपण आपल्याला जितके शक्य होईल तितक्या प्रमाणात डिजीटल वौलेट्स (उदाहरणार्थ - फ्रीचार्ज, पेटीएम) वापरायला हवीत याने प्रत्येक व्यवहार नोंदवला जातो आणी त्यामुळे अतिशय सूक्ष्म प्रमाणात का होईना अर्थव्यवस्थेला गती मिळते आणी व्यवहार नोंदणी झाल्यामुळे काळ्या पैशाला अडसर निर्माण होतो.

मंडळींनो, यावर तुमचे मत काय आहे ?

मी मान्य करतो. उत्तम भविष्यासाठी आणि विकासासाठी हे आवश्यक आहे. भारत हा मुळात: लोकशाही प्रधान देश आहे. आणि सोबत आपल्या देशात तंत्रज्ञाबाबत जागरूक असा मोठा वर्ग आहे. या वर्गाला आपण डिजिटल करंसीच्या माध्यमात अनू शकतो. बिटकॉइन ने आगोदरच आपली सिद्धता प्रमाणित केली आहे.

या धाग्यावर विचार मांडताना मराठी भाषा वापरण्यात यावी ही किमान अपेक्षा आहे, महाराष्ट्रातील मुख्य शहरांमध्ये आपण मराठी बोलणं सोडलेलचं आहे, कृपया या धाग्यावर नियम पाळण्यात यावेत.

मराठी टायपिंग शक्य नसल्यास इंग्रजी लिपी वापरून मराठी लिहावी (उदा - Me Sahamat Aahe) पण मराठीचा आग्रह आहेच.. (महाराष्ट्रातील गावागावात बीटकॉईनच्या प्रसारासाठी ते आवश्यक आहे).

आपल्या आग्रहास्तव आणि मातृभाषेसाठी आम्ही आपला विचार मान्य करतो.

धन्यवाद.

आभारी आहोत.
hero member
Activity: 1190
Merit: 534
अर्थव्यवस्थेच्या बाबतीत आपण आधीच चीनच्या खूप मागे आहोत, बीटकॉईन सारख्या नव्या तंत्रज्ञानाचा प्रसार चीनमध्ये सर्वाधिक वेगाने होत आहे.. भारतातही याबाबत जनजागृती व्हायला हवी. जनधन योजना, स्टार्टअप इंडिया, कुशल भारत सारख्या योजनांमुळे नक्कीच याला गती मिळेल.

आपण आपल्याला जितके शक्य होईल तितक्या प्रमाणात डिजीटल वौलेट्स (उदाहरणार्थ - फ्रीचार्ज, पेटीएम) वापरायला हवीत याने प्रत्येक व्यवहार नोंदवला जातो आणी त्यामुळे अतिशय सूक्ष्म प्रमाणात का होईना अर्थव्यवस्थेला गती मिळते आणी व्यवहार नोंदणी झाल्यामुळे काळ्या पैशाला अडसर निर्माण होतो.

मंडळींनो, यावर तुमचे मत काय आहे ?

I agree. Its important to make awareness of virtual digital currency in India for better future and features. India is already one of the biggest democratic country. And have higher percentage of tech fascinated audience. This audience can bring in the flow of digital currency, as already bitcoin is proved its own existence globally.

Jump to: